
दि.०६ जानेवारी रोजी शिर्डी येथील पत्रकार अधिवेशनात होणार पुरस्काराचे वितरण.
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशीम : दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने, पत्रकार दिनानिमित्त, ‘दर्पण जीवन गौरव पुरस्कारांची’ घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून त्यामध्ये, रिसोड,जि. वाशिम येथील आदर्श पत्रकार,गजानन श्रीराम बानोरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट सेवाव्रती कार्याची दखल घेवून, त्यांना “दर्पण जीवन गौरव” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार,दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वा. श्री. संत साईबाबांची पवित्र पावन पुण्यभूमी असलेल्या शिर्डी येथे होणार आहे. हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला/पुरुष यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.यामध्ये गजानन श्रीराम बानोरे यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे. ही वार्ता कारंजा मध्ये येवून धडकताच,त्यांचे मित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,ज्येष्ठ साहित्यीक,लोककलावंत, साप्ता.करंजमहात्म्यचे संपादक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, अखिल भारतिय नाट्य परिषद मुंबईचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर,दैनिक मातृभूमीचे वाशीम आवृत्ती संपादक निलेश सोमाणी,पत्रकार लोमेश पाटील चौधरी,उमेश अनासाने,विजय खंडार,पत्रकार विनोद गणवीर, आदींनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.















