prabodhini news logo
Home चंद्रपूर मोहबोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव उत्साहात साजरा

मोहबोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव उत्साहात साजरा

0
99

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – सिंदेवाही : माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी 8 वाजता ग्राम स्वच्छता अभियान, सकाळी 9 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी गेडाम, माजी उपसभापती पं. स. सिंदेवाही तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भा. बौ. महा. चंद्रपूर जि. पूर्व, चंद्रमनी खोब्रागडे, माजी सरपंच ग्रा. पं. मोहाळी, जीवन भरडे, सामाजिक कार्यकता, विसापूर तर विशेष अतिथी म्हणून गुलाब मेश्राम, मधुकर गुरनुले, जयेश मोहुर्ले, गिरमाजी लेनगुरे, बळीराम मोहुर्ले, मनोहर मोहुर्ले, भुजंगराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा समाज गौरव गौरव पुरस्काराने सन्मानित व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. त्यानंतर 2 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन आयोजन व चर्चासत्र आणि नंतर त्यासोबतच महिलांचे व मुला-मुलींच्या विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता गावसह भोजनानंतर रात्री 8 वाजता महिलांचे व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते. या कार्यकर्माचे संचालन राजेवार तर आभार आरती खंगार यांही केले. कार्यकर्माच्या यशस्वी करण्यासाठी माळी समाज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आणि ग्रामवाशीय मोहबोडी याचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here