
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : कोरची प्रीमियर लिग २०२६ अंतर्गत आयोजित क्रिकेटच्या महासंग्रामास दिनांक ०२ जानेवारीपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. दररोज सायंकाळी ६.०० वाजेपासून होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन दिनांक १३ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आले असून, ही स्पर्धा लगान क्रिकेट ग्राउंड, फवारा चौक, कोरची येथे सुरू आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
स्पर्धेमध्ये विविध संघ सहभागी झाले असून, क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. परिसरातील नागरिक, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
त्या प्रसंगी उपस्थित: माजी आमदार कृष्णा गजबे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी सभापती परसराम टिकले, नगराध्यक्षा नगर परिषद कोरची हर्षलता भैसारे, तहसीलदार प्रशांत गड्डम, सदरुभाई भामानी उपस्थित होते.















