
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महायुती मध्ये रिपब्लिकन पक्षाला सापत्न वागणुक व राजकीय अस्पृश्यता बाळगल्याचे दिसून आल्याने. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देताच. बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाने मुंबईच्या विवीध प्रभागातून दंड थोपटत प्रभागात केलेल्या कार्याच्या जोरावर स्वबळावर आपले उमेदवार उभे केले आहेत.
प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष व नेतृत्व उभे असल्याचे चित्र दिसत आहे.रिपब्लिकन पक्षाच्या गोरेगाव विधानसभेतील वार्ड क्र. 54 च्या अधिकृत लोकप्रिय उमेदवार रेश्मा खान यांच्या प्रचारार्थ दिनांक 8/1/2026 रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक संत रविदास महाराज नगर कामा इस्टेट गोरेगाव पूर्व मुंबई येथे जाहीर चौक सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी राष्ट्रीय नेतृत्व व प्रमुख सल्लागार मा. सीमा रामदास आठवले यांच्या प्रमूख उपस्थितीथीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.काकासाहेब खंबाळकर, महीला आघाडी राष्ट्रीय सरचिटणीस मा.एड. आशा लांडगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एड.अभया सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.उषा रामलूजी,मुंबई प्रदेश सरचिटणीस मा.बेला मेहता, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष मा.स्वप्नाली जाधव, मा.दिप्ती, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.गणपत भोईर, उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हा कार्याध्यक्ष मा.दगडु काळेजी, मा.बालाजी जाधव महीला आघाडी मा.गवळणताई जाधव गोरेगाव विधानसभेतील समस्त रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित राहून या चौकसभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.मा.सिमा रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत लोकप्रिय उमेदवार रेश्मा खान यांना या निवडणूकीत भरघोस मतानी निवडुण देण्याचे आवाहन करण्यात आले.

या सभेचे सूत्रसंचालन गोरेगाव तालुका सरचिटणीस मा.गुरुनाथ गायकवाडजी यांनी केले तर आयोजन गोरेगाव तालुका अध्यक्ष रमेश वि.पाईकराव यांनी केले तर मा.छायाताई र.राऊत, मा.व्यंकटेश शेट्टी मा.दिपक सहेजराव,मा.बबलु ढवारे, मा.जलाल शेख,मुख्तार शेख, मा.विजय सागरे, मा.विजय धबाले,मा.मुस्तकीम शेख, मा.दिलीप विश्वकर्मा, मा.प्रविण चांदमारे,मा.रमेश आघाम, मा.अविनाश कांबळे,मा.देविदास मोरे व इतर मान्यवरांचे मनपुर्वक आभार मानले.















