prabodhini news logo
Home अकोला बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

0
67

वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचा पुढाकार; समाजबांधवांची मोठी उपस्थिती

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘बौद्ध वधू-वर परिचय मेळावा’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि विक्रमी उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनासोबतच वधू-वरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

या भव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंदनीय भंते राज ज्योती यांनी उपस्थितांना आशिर्वचन दिले. तसेच ज्येष्ठ विचारवंत भास्कर भोजने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि नंदकुमार डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून वधू-वर मेळाव्यांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.

या मेळाव्यात केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे, तर इतर भागांतूनही मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका आणि वधू-वर इच्छुक युवक-युवती सहभागी झाले होते. परिचय सत्रादरम्यान अनेकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. यामध्ये आम्रपाली खंडारे, राहुल इंगळे, देवानंद अंभोरे, अंभोरे, रूपाली गवई.
संजय उमाळे, संजय पाटील, पराग गवई, प्रभा शिरसाट, नाजुकराव इंगळे.

विलास दामोधर, देवराव वानखेडे, मंगेश गवई, धम्मा तायडे, सिद्धार्थ वानखडे,
गौतम शिरसाट, दादाराव वानखडे, भारत निखाडे, सुमित खंडारे, प्रमोद शिरसाट,
बबलू शिरसाट, बाबाराव बागडे, पुरुषोत्तम डोंगरे, दिलीप सरदार, गणेश वानखडे, प्रल्हाद हेरोडे, गुलाब उमाळे, सुहास इंगळे, निरंजन सिरसाठ, रामराव सावळे, तानाजी मोरे, मनोज गवई, राजू मोरे, संदेश मोरे, गौतम घ्यारे, सुनील मोरे.

दीपक घ्यारे, सुभाष तायडे, संजय वानखेडे, रमेश इंगळे, एड. उमाळे, संदीप दामोधर, आयुष्यमान मेश्राम, नितेश तायडे, डॉ. योगेश इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here