prabodhini news logo
Home ठळक बातम्या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे धुळे जिल्ह्यात धरणे आंदोलन संपन्न

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे धुळे जिल्ह्यात धरणे आंदोलन संपन्न

0
50

धुळे तालुका प्रतिनिधी
संकेत प.बागरेचा
प्रतिनिधी न्यूज

समान नागरिक संहिता (Uniform Civil Code) बिल केंद्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. त्या विरोधात *मा. एन. एच. रेकवाल साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद* यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात *३१ राज्य व ५६७ जिल्ह्यात* धरणे प्रदर्शन व राष्ट्रपतींच्या नावे निवेदन या प्रथम चरणांतर्गत आंदोलन आज *धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा* येथे आयोजित करण्यात आले होते.

या घातक बिलामार्फत आदिवासी बांधवांचे पाचवी व सहावी अनुसूची सोबतच विविध विशेष अधिकाराचे हनन होणार आहे. या व्यतिरिक्त ओबीसी, अनुसूचित जाती, भटके विमुक्त, मुस्लिम, शिख ,ख्रिश्चन अशा ८५% मूलनिवासी बहुजनांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात संविधानिक हक्क अधिकाराचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे.

त्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे चरणबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दुसऱ्या चरणाचा कार्यक्रम १८ जुलै प्रत्येक तहसीलवर धरणे प्रदर्शन, तिसरे चरण २७ जुलै जिल्हास्तरीय रॅली प्रदर्शन तसेच ४ थे चरण ७ ऑगस्ट रोजी भारत बंद केला जाणार आहे.

आदिवासींची मूळ ओळख नष्ट होऊन त्यांना हिंदू बनवण्याचे षडयंत्र आहे. या विरोधात देशभरात आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आज ६ जुलै २३ रोजी शिंदखेडा तहसीलदार मा. ज्ञानेश्वर सपकाळे साहेब यांचेकडे राष्ट्रपतींच्या नावाने यासंदर्भात निवेदन सुपूर्द करण्यात आले.

यात प्रामुख्याने मा.रामसिंगदादा धुडकु भिल (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, शिंदखेडा),मा.नाना शिवराम पिंपळे (बहुजन मुक्ती पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष), मा.शशिकांत अण्णा बैसाणे (बहुजन क्रांती मोर्चा,शिंदखेडा संयोजक) मा. दिपक दशरथ भिल (अखिल भारतीय भिल्ल समाज मंच, संस्थापक अध्यक्ष), मा. अभिमन पवन पाटोळे (अध्यक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, शिंदखेडा) प्रा.मधुकर मंगळे सर (बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, शिंदखेडा तालुकाध्यक्ष), प्रा. निरंजन वेंदे सर, (सामाजिक कार्यकर्ते) मा.आर.यु.बागुल (कोळी समाज सामाजिक कार्यकर्ता) प्रा. सारनाथ बोरसे (सामाजिक कार्यकर्ता शिंदखेडा) आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here