वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर- येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड,जिल्हा प्रशासन चंद्रपूर, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलमिको मुंबई व दिव्यांग कौशल्य विकास मल्टी सोसायटी चंद्रपूर तर्फे सेलच्या सीएसआर निधी अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यक उपकरणांच्या वाटपासाठी मूल रोडवरील चंद्रपूर फेरो आलोय संयंत्र च्या मुख्य प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांचे तपासणी करण्यात आली. सेल चंद्रपूरचे के. रामकृष्ण कार्यपाल निर्देशक, विश्वनाथ. बी मुख्य महाप्रबंधक यांच्या मार्गदर्शनात हे तपासणी शिबिर घेण्यात आले.
यामध्ये गरजू दिव्यांगांना अंधकाठी स्मार्ट केन, व्हीलचेअर, शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना मोबाईल स्मार्टफोन, कृत्रिम हात व पाय, मोटोराइज्ड ट्रायसिकल, साधी सायकल, श्रवण यंत्र, एम आर किट, कुबडी इत्यादींचे वाटप डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरिता सेल चंद्रपूरचे पर्सनल मॅनेजर पिंटू पजाई, अल्मिकोचे अक्षय गावंडे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे भास्कर झलके, दिव्यांग कौशल विकास संस्थेचे निलेश पाझारे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे डॉ. पियुष मेश्राम उपस्थित होते यावेळी दीडशेच्यावर दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मुन्ना खोब्रागडे, नितीन खोब्रागडे, मनोज अस्वले, प्रमोद डोंगरे, सुरज झाडे, शिवसागर चंदनखेडे, रवींद्र उपरे, दर्शना चाफडे, पुष्पा सावसाकडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

