मुल प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भेजगांव :- समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली आणि एनसीईआरटी नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कला उत्सवात पुणे येथील महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या महोत्सवात राज्य स्तरीय कला उत्सव एकपात्री स्पर्धेमध्ये माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूल,ची विद्यार्थिनी किमया किरण खोब्रागडे ला प्रथम बक्षीस मिळाले असुन तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, वर्षा पिपरे गटशिक्षणाधिकारी मुल, जयश्री गुज्जनवार विस्तार अधिकारी बीट मारोडा, प्रमोद कोरडे केंद्रप्रमुख मारोडा, मुख्याध्यापिका रीमा कांबळे, उपमुख्याध्यापक अस्पाक सय्यद, वर्गशिक्षक वामन कवाडकर, कला शिक्षक सचिन वाढई आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या यशाचे श्रेय तिने मुख्याध्यापिका, शिक्षक व आईवडीलांना दिले.

