शिरूर अनंतपाळ येथील कवि संमेलनात बाबूराव बोरोळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

0
28

लातूर प्रतिनीधी
प्रबोधिनी न्युज

भारतीय संविधान दिनानिमित्त काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिरुर अनंतपाळ द्वारा आयोजित श्री‌.अनंतपाळ मराठी ग्रामीण कवी संमेलन आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी कै.जेष्ठ साहित्यिक काशीनाथ फुलारी गुरुजी साहित्य नगरी आनंद फंक्शन हाॅल तालुका शिरूर अनंतपाळ येथे संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या पत्रकारांना व उत्कृष्ट कवि धारकाना विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना मान्यवरांना संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात 1988 पासून अनेक अन्यायाना वाचा फोडून ग्रामीण भागात न्याय देऊन उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील जेष्ट पत्रकार बाबूराव नामदेवराव बोरोळे यांना शिरूर अनंतपाळ नगरी येथे संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार अॅड रमेश अण्णा उंबरगे कविसंमेलन अध्यक्ष शिरूर अनंतपाळ.शिवाजीराव माने शिवसेना जिल्हा प्रमुख लातूर. सुषमा मठपती नगर परिषद उपाध्यक्षा शिरूर अनंतपाळ. श्री. अनंतपाळ मराठी ग्रामीण कवी संमेलनात प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमा बस्वराज मठपती उपाध्यक्षा नगर पंचायत शिरूर अनंतपाळ.हया होत्या तर अॅड रमेश अण्णा उंबरगें संमेलन अध्यक्ष होते.तसेच शिवाजीराव माधवराव माने शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर हे उदघाटक होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमूख अतिथी म्हणून प्रा.प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी. माजी आमदार रामभाऊ गुडिले. प्रा.डाॅ. सोमनाथ रोडे.डाॅ.अरविद भातांबरे.भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील.भागवत वंगे शिवसेना तालुकाप्रमुख शिरूर अनंतपाळ.प्रा. पत्रकार सोमनाथ स्वामी.तथागत ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष राहुल कांबळे.पत्रकार लक्ष्मण रणदिवे.धनाजी माटेकर.विलास कांबळे.राहूल कांबळे पत्रकार महतआब शेख.बस्वराज मठपतीआदि मान्यवर प्रामूख्याने ऊपस्थित होते.
राज्यस्तरीय भव्य अशा सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार व कवित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य लेखणीतून करतआहात व अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे जेष्ठ पत्रकार बाबूराव बोरोळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संपूर्ण लातूर जिल्ह्यातून व शिरूर अनंतपाळ तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here