माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले
ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
तालुक्यातील मेंडकी येथे 26 नोव्हेंबरला खास संविधान दिनानिमित्त भिमदिवाने भोजन पार्टी, मेंडकी यांच्या वतीने तेजरामजी ढवळे यांच्या भव्य आवारात पंचशील रंगभूमी प्रस्तूत ज्वालामुखी या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आलं होते. या *नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या नाटकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. यशवंत आंबोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून मंगला इरपाते सरपंच मेंडकी, उपाध्यक्ष म्हणून थानेस्वर कायरकर माजी पं.स. ब्रम्हपुरी, कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राजेंद्रभाऊ आंबोरकर विटा ठेकेदार मेंडकी यांनी केले तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वंदना शेंडे माजी सभापती पं.स. ब्रम्हपुरी, मंगला लोनबले माजी सरपंच मेंडकी, राजेंद्र आंबोरकर सदस्य ग्रा.पं.मेंडकी, चिंताराम जेल्लेवार सदस्य ग्रा.पं.मेंडकी, कुंदा कोरेवार सदस्य ग्रा.पं.मेंडकी, विद्या चौधरी सदस्य ग्रा.पं.मेंडकी, वकार खान सचिव शहर.काँ.क. ब्रम्हपुरी, आकाश लोणारे लेबर सप्लायर, चवरे सर, भुवन खोब्रागडे, गोपाल कसारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाच्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद चिमूरकर म्हणाले की, आपल्या विदर्भात झाडीपट्टी रंगभूमीचे सुप्रसिध्द कलावंत मंडळी आहेत. कलेला प्रोत्साहन देणारी झाडीपट्टी रंगभूमी १०० पूर्वी पासून आपल्याकडे आहे. या नाटकांच्या माध्यमातून आपल्याकडे भेडसावत असलेल्या अनेक समस्या, जागृती आणि मानवाला स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहायला लावणारी कलाकृती सादर केली जात असते. बदलत्या काळासोबत नाटकांचे स्वरूपही बदललेले आहे परंतु या नाटकेच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा आणि संस्कार यांची जोपासना व्हावी. असे मत त्यांनी मांडले.
खास संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाटकाचा मेंडकी येथील जनतेने आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

