prabodhini news logo
Home चंद्रपूर सिध्दार्थ ग्रूपच्या वतीने डोंगरगाव (बुज.) येथे भारतीय संविधान दिन साजरा

सिध्दार्थ ग्रूपच्या वतीने डोंगरगाव (बुज.) येथे भारतीय संविधान दिन साजरा

0
118

कु. सोनाली कोसे
नागभिड तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

नागभिड तालुक्यातील डोंगरगाव (बुज.) येथे भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सिध्दार्थ ग्रूपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात उपस्थित सिध्दार्थ ग्रूपचे अध्यक्ष – मा. धर्मेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष – मा. सचिन खोब्रागडे, कोषाध्यक्ष – मा. कुणाल कोसे , सचिव – मा. गणेश मेश्राम, मा. सागर मेश्राम , प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. आर. डी. रामटेके (साप्ता. निवाडा), बौद्ध समाज आम्रपाली महिला मंडळच्या अध्यक्षा मा. रजनी मेश्राम, बौद्ध समाज डोंगरगाव (बुज.) कमिटीचे अध्यक्ष – मा. अजयजी कोसे, उपाध्यक्ष – मा. यशवंत रामटेके, कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष मा. पुरूषोत्तम रामटेके कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारतीय संविधान हे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण भारत देशासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी न म्हणता आम्ही भारताचे लोक असा संविधानात उल्लेख करून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, हक्क मिळवून दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार न करता अगोदर कलम 340 – OBC, कलम 341 – ST आणि सर्वात शेवटी कलम 342 – SC साठी लागू केला. म्हणजेच सर्वप्रथम OBC वर्गाचा विचार केला आणि नंतर बहुजन बांधवांचा विचार करून आर्टिकल लागू केले. आज जे आपण नवनवीन कपडे घालतो, सुटाबुटात, मोठमोठ्या बंगल्यात राहतो, आपल्याला बोलण्याचं, मुक्त संचार करण्याचं , स्टेजवरती उभं होऊन बोलण्याचं हे सगळे स्वातंत्र्य आपल्या संविधानातून मिळवून देण्याचं सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातोय असे थोडक्यात मत कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी रामटेके यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आजची तरुण पिढी स्टेजवरती येऊन बोलण्याला घाबरतोय. त्यांनी न घाबरता स्टेजवरती येऊन बोलावे व स्वतः मधील कुशलता लोकांपुढे मांडावी असे मत कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी मा. आर. डी. रामटेके (साप्ता. निवाडा) यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय संविधानाबद्दल अधिक माहिती बौद्ध समाज डोंगरगाव (बुज.) कमिटीचे अध्यक्ष मा. अजय कोसे यांनी आपल्या विचारातून परखडपणे व्यक्त केले. तसेच मा. गिता राऊत यांनी आपल्या भाषणातून दोन शब्द सांगून आपले विचार व्यक्त केले. यावेळी सिध्दार्थ ग्रूपचे सदस्य, सभासद तसेच बंधू भगिनींनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली व भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here