रूपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधि
गडचिरोली
लायड मेटल कंपनी आणि वरात इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी च्या प्रकल्पा करीता चामोर्शी तालुक्यातील कोणसरी, मुधोली, सोमनपल्ली, जयरामपूर, पारडीदेव या गावातील जमीनी अधीग्रहित करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला. या जमीन अधीग्रहनाचा स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येते आहे.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसाण, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, काँग्रेस नेते हरबाजी मोरे सह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुधोली गावात भेट देऊन जमिनी अधिग्रहनाबाबत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
जमीन अधिग्रहनाअंतर्गत येणारे सर्व अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे शेतीच आहे. अधिग्रहणाअंतर्गत देण्यात येणारी मदत ही अत्यल्प असून त्यामुळे एका पिढीचाही जगणं कठीण होणार आहे, स्थानिकांना रोजगार देऊ म्हूणन कंपनी कडून नेहमीच स्थानीक युवकांची फसवणूक केल्या जाते, या प्रकल्पामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमानात वाढ होत आहे, रस्त्यांची पूर्णतः दुरावस्था होत असल्याने स्थानिकांनी या जमीन अधिग्रहनाला पूर्णतः विरोध केला आहे.
शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतनारा विकास होत असेल तर अश्या विकासाला काँग्रेस पक्ष नेहमीच विरोध करेल व शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई लढून रस्त्यावरही उतरेल इतकेच नाही तर वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अधिग्रहणाचा विषय विधीमंडळात लावून धरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असा विश्वास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित गावाकऱ्यांना व शेतकऱ्यांना दिला.
यावेळी सोमणपल्ली ग्रामपंचायत सरपंच नीलकंट निखाडे, कोणसरी सरपंच श्रीकांत पावडे, मुधोली उपसरपंच किशोर खामनकर, आदिवासी काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश कोडापे, रतन आकेवार, मुना गोंगले, मुधोली येथील ग्रामस्थ नामदेव पालं, मोहन बुरनवार, उमाजी पाल, देवराव आत्राम, रघुनाथ दुर्गे, दादाजी बल्की, नानाजी भोयर, ऋषीं कुळमेथे, मुरलीधर जुमनाके, सुधाकर आलाम, मारोती सरपे, लक्ष्मण ठुसे, लीकेश ठाकूर, अशोक तावडे, विठ्ठल बलकी, रामदास पिदूरकर, सूनिल सकाळे, प्रवीण ठुसे, सत्यनारायण डोंगरे, माणिक डोंगरे, विठाबाई कडते, वनिता कोडापे, सुवर्णंमाला कोरडे, सविता आलाम, मंदा बोमकंटीवार, किरन जुमनाके सह मोठ्या संख्येने गावकरी यावेळी उपस्थित होते.

