चंद्रपुर प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
आज दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या विचारांना आदर्श ठेऊन स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर जिल्हा टीम च्या माध्यमातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत आष्टनकर यांच्या मार्गदर्शनात शहरातील ऐतिहासिक अंचलेश्र्वर किल्ला व मंदीर या परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परीसर स्वच्छ केले. प्लास्टिक व इतर केर कचरा गोळा करून श्रमदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका प्रमुख रोशन आस्टुनकर, शहर प्रमुख करीना बोपचे, कोषप्रमुख अपेक्षा भालेराव, पर्यावरण प्रमुख अभिषेक गुज्जनवार, सागर देव, दिप्ती खोब्रागडे, अंकित पांडे, ऋतुजा जमदाडे व परिसरातील सामान्य नागरीक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या अभियान बद्दल कौतुक व्यक्त केले.

