कोरोनाचे मी पुन्हा येईनचे संकेत;जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट, नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज

0
75

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – देशात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे दिवसागणिक केसेस वाढल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे कोरोनाने मी पुन्हा येईनचे संकेत दिल्याचे मागील काही दिवसातील आकडेवारीवरून दिसून येत आहे यापूर्वी कोरोना महामारीने सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.
कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट JN 1 ची २१ नवीन प्रकरणे नोंदवली गेली तर गोव्यात १९ प्रकरणे त्याशिवाय महाराष्ट सह केरळमध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाने मी पुन्हा येईनचे संकेत दिले आहे यापूर्वी महाराष्ट्र सह संपूर्ण देशाने कोरोनाचा हाहाकार पहिला आहे त्यामुळे आता कोरोनाकडे दुर्लक्षित करून चालणार नाही याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे जिल्हयात आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही ही जिल्ह्याच्या दृष्टीने जमेची बाजू असली तरी कोरोनाने दिलेले संकेत याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्यामुळे आरोग्य विभागाने आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हाशल्यचिकिसक सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाची सध्या स्थिती जाणून घेत आहेत त्या रुग्णालयातील बेड व्यवस्थित आहे की नाही, पीपीई किटचा किती साठा आहे, ऑक्सिजन आहे की नाही, कोविड टेस्टिंग साठी लागणारे साहित्य या सर्व बाबींची माहिती घेत आहे ही सर्व माहिती
गोळा करून सोमवार पर्यंत वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती स्वतः जिल्हाशल्यचिकिसक यांनी विदर्भ केसरी शी बोलतांना दिली आहे

जिल्ह्यात ऑक्सिजनची स्थिती
मागील कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता ज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे चित्र निर्माण झाले होते यावेळी मात्र
जिल्ह्यात ऑक्सिजनची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे ऑक्सिजनच्या निर्मितीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे जवळपास जिल्हयात १६ ठिकाणी ऑक्सिजनची निर्मितीची व्यवस्था असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे सोबतच ४००च्या वर ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे

कोविड टेस्टिंग वाढविल्या जाणार
कोविड व्हेरियंटची महाराष्ट्रात एन्ट्री झाली असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे या नवीन व्हेरियंटचे निदान करण्याकरता कोविड टेस्टिंग वाढवल्या जाणार आहे
सोबत शासनाच्या वेळोवेळी आलेल्या गाईडलाईन नुसार त्यावर काम केल्या जाईल त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे :-डॉ दिलीप सौंदळे,जिल्हाशल्यचिकिसक

JN.1 प्रकार भारतात कुठून आला?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चे (ICMR) चे महासंचालक डॉक्टर राजू बहल यांच्या मते पहिला JN.1 व्हेरियंट आठ डिसेंबर रोजी केरळ मधील तिरुअनंतपुरम येथे आढळून आला ७९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे महिलेमध्ये इन्फयुजा सारखी आजाराची सोम्य लक्षणे होती. मात्र नंतर ती बरी झाली कोविड सब व्हेरियंट JN.1 युरोपियन देश लॅम्ब्याक मध्ये ओळखले गेले येथून ते अनेक देशांमध्ये पसरू लागले हे सब व्हेरियंट पिरोली व्हेरीएंटसी जोडलेले आहे (BA.2.86) हे मानवी शरीराच्या प्रतिकार शक्तीसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच नवीन सब व्हेरियंटबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here