अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) शहर येथे संताजी सभागृह येथे भाजपा ची युवा मोर्चा आयोजीत कार्यकरणी बैठक करण्यात आली होती.
या बैठकीत युवा मोर्चा अंजनगाव सुर्जी शहर उपाध्यक्षपदी यश शाहू यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थीत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्यभाऊ पानरपडे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव चांदुरकर,जिल्हा सरचिटणीस भाजपा डॉ विलास कविटकर,शहर अध्यक्ष उमेशभाऊ भोंडे,माजी आमदार रमेशजी बुंदीले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त यांच्या उपस्तिथ सदर ही नियुक्ती देण्यात आली.
त्यांच्या या नियुक्तीने अंजनगाव सुर्जी तालुक्यात व त्यांच्या मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. व त्यांना पुढील उज्वल भविष्य साठी शुभेच्छा देण्यात आले.

