विदर्भातील डिजिटल पत्रकार कृषी अभ्यास दौऱ्यावर

0
88

उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज

नागपूर, दि. 29 डिसेंबर 2023: विदर्भातील डिजिटल पत्रकारांच्या 40 जणांच्या चमूने आज नागपूरहून जळगावकडे जाणाऱ्या कृषी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार सहभागी झाले आहेत.

या दौऱ्यात पत्रकारांना जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. येथील जैन हिल्सच्या शेती संशोधन प्रात्याक्षिक केंद्राला भेट दिली जाणार आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. यात भविष्यातील शेती (फ्युचर फार्मिंग), माती रहित मिडीयामध्ये शेती, हार्ड्रोपोनिक, एरोपोनिक फार्मिंग, टिश्यूकल्चर तंत्रज्ञान, जगातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक बायोटेक लॅब सह अन्य प्रकल्प समजून घेण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या पत्रकारांमध्ये प्रतिक साबळे, दिलीप घोरमारे, अनुप पठाणे, विलास गोंदोळे, आशिष धापुडकर, सचिन धानकुटे, संजय धोंगडे, गणेश शेंडे, राजेंद्र कवडूजी निमसटकर, शेख दिलदार शेख सिकंदर, प्रशांत कृष्णाजी चंदनखेडे, सचिन पांडुरंग मेश्राम, अनंता सिताराम गोवर्धन, सुलेमान बेग, किशोर कारंजेकर, गोपाल कडुकर, प्रफुल्ल उरकुडे, आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, राजेंद्र उट्टलवार, सनी भोंगाडे, सुरेश डांगे, शेखर गजभिये, नत्थयू रामेलवार, कवीश्वर खडसे, संदीप गौरखेडे, अनिलसिंग चव्हाण, अनुप भोपळे, आणि रुपेश वणवे, राजू डोंगरे, दिनेश लायचा यांचा समावेश आहे.

या दौऱ्यामुळे पत्रकारांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती मिळेल. या माहितीचा वापर करून ते शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here