विजय जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद
रविंद्र मैंद
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध गावांतील विजयदुतांची बैठक ब्रम्हपूरी येथील कमलाई निवासस्थान येथे आज दि. 30 डिसेंबर रोजी संपन्न झाली. गावपातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. यावेळी अनेक अडथळ्यांचा सामना सुध्दा त्यांना करावा लागतो. काही नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून देखील वंचित राहतात. ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन ब्रम्हपूरी तालुक्यातील प्रत्येक गावात विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. त्यासंदर्भाने या विजयदुतांची बैठक आज संपन्न झाली आहे.
या बैठकीच्या निमित्ताने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष गणवीर, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, सोशल मीडिया विधानसभा प्रमुख चोकेश्वर भरडकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक राहुल मैंद यांनी केले.

