कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे वर्ग एक ते आठ पर्यंत जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा कार्यरत असुन येथे शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जन करतात.या विद्यार्थीसाठी नविन वर्ग खोलीची आवश्यकता होती याबाबत प्रशासनाला पाठपुरावा केलाआणि शाळेची समस्या ओळखुन त्यावर तात्काळ वरील स्तरावर याची मागणी करुण जिल्हा निधीतुन हया शाळेच्या वर्ग खोलीचे बांधकामास मंजुरी मिळवली. त्याचा बांधकाम भुमीपूजन सोहळा सरपंच अशोक गभणे,रमाकांत लोधे माजी जी. प. सदस्य, राजेंद्र बोरकर माजी जी. प. सदस्य, दिनेश्वर लोधे, ग्राम पंचायत सदस्य वामन झोडे, उषा धारणे, माया लोधे ,रजनी काऊलकर ,मुख्याध्यापक रेखा पंधरे, संदीप डोंगरवार, संजय गहाणे ,योगीदास लोधे ,गीरीश बोरकर ,मंगेश बोरकर, नेताजी गहाने, शिक्षक दिनकर गायकवाड ,ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावातील महिला, पुरुष यांच्या उपस्थीतीत हा भुमीपूजन सोहळा पार पडला.

