श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी, जिवती
प्रबोधिनी न्युज
अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन 4 डिसेंबर 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप चालू आहे.या बेमुदत संपाचा निवेदन.. 4 डिसेंबर पासून किती तरी वेळा प्रत्येक कर्यालात देण्यात आले. जसे ग्रामपंचायत,ICDS कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन गावपातळीवर येणाऱ्या सर्व कार्यालय या बेमुदत संपांचे निवेदन देण्यात आले आहे. व आजचा संपाचा 38 वा दिवस असून अंगणवाडी सेविकांच्या कोणत्याही मागण्याचे शासनाने दखल घेतली नसून या उलट शासनाने शोकास नोटिस अंगणवाडी सेविकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां मार्फत धाक धपड करून अंगणवाडी सेविकाना देण्यात आला आहे. त्या शोकास नोटीचासे अंगणवाडी सेविकांनी आज दिनांक 12/01/2024 ला तहसील कार्यालय समोर निषेध (होळी) करून जाळण्यात आले. आणि जो पर्यंत शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत हा संप चालूच राहील. असा जिवती तालुक्यातील सर्व सेविकांच ठाम मत आहे. व शासनाने कोणत्याही मागण्या पूर्ण केले नाही सेविकांच्या मागण्या आहेत की त्यांना पेन्शन लागू करावं, ग्राज्युटी लागू करावं ,किमान मानधन नव्हे तर वेतन द्यावं, लाभार्थ्यांना उच्च दर्जाचा आहार पुरवठा करावं असे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आहेत. निषेध करताना सेविका सर्व जीवती तालुक्यातील अंगणवाडी सेविका या मध्ये मोठया संख्येने उपस्थित होत्या..

