चंद्रपूर येथे “बेटी बचाओ बेटी पढाओ” या कार्यक्रमाचे आयोजन

0
76

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर दि. 13 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीद्वारे ब्राईट इंग्लिश स्कूल चंद्रपूर येथे “बेटी बचाओ बेटी पढाओ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गोपाल मुंदडा, प्रमुख वक्त्या मा.अश्विनी खोब्रागडे तसेच स्त्रीरोगतज्ञ मा डॉक्टर नसरीन मवानी यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी ब्राईट स्कूलच्या संयोजिका मा. निवेदिता कवाडे तसेच चंद्रपूर बचाव संघर्ष समिती परिवाराचे सदस्य डॉक्टर पालिवाल यांनीही आपले विचार मांडले. डॉक्टर मवानी यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता विकसित शिक्षण प्रणाली आणि शाळा यांची सांगड एकमेकांसोबत कशी घालता येईल यावर प्रकाश टाकला, तसेच अश्विनी खोब्रागडे यांनी देखील आजही मुलींना सुरक्षिततेची कशी गरज आहे आणि त्यांना सेल्फ डिफेन्स चे धडे कशा पद्धतीने दिले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल मुंदडा यांनीही विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि शालेय विकास यावर आपले विचार प्रगट केले. कार्यक्रमाकरिता चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे सदस्य डॉक्टर शर्मिली पोद्दार दालिया चव्हाण सुविद्या बांबोडे, अंजलीना साळवे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शितल वडलकोंडावार आणि आभार प्रदर्शन मा. मोहम्मद जिलानी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here