आम आदमी पार्टी भद्रावती ने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज देशात आजादी का अमृत महोत्सव म्हणून संपूर्ण लोक साजरे करतात. परंतु एक गाव असा आहे जिथे अजूनही स्मशानभूमीच नाही. भद्रावती तालुक्यात लोणारा या गावात अजूनही स्मशान भूमी नाही म्हणून रस्त्याच्या काठेलाच प्रेत जाळतात. ग्रामपंचायतला गावकऱ्यांकडून मागणी करून सुद्धा या गावात स्मशान देण्यात आले नाही. या संबंधित विषयाची आम आदमी पार्टी भद्रावती ला गावकऱ्याकडून माहिती मिळाली. विलंब न करता दिनांक 11/01/2024 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शिष्टमंडळ व समस्त गावकरी गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांच्या दालनात पहोचले. निवेदन मार्फत त्यांना कळविण्यात आले की, गावात स्मशानभूमी ची अत्यंत गरज आहे, रस्त्याच्या कडेला प्रेत जाळले जातात. आपणास विनंती आहे की, संबंधित विषयाची गांभीर्याने लक्ष देऊन स्मशान भूमी तयार करून देण्यात यावे. अन्यथा संपूर्ण गावकऱ्याना घेऊन आम आदमी पार्टी रस्त्यावर प्रेत घेऊन आंदोलन करेल, असा इशारा आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शहा यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. या विषयी गांभीर्याने लक्ष घेत संबंधित आधिकऱ्याला स्मशान भूमी तयार करण्यात यावे असे आदेश गटविकास अधिकारी साहेब यांनी दिले. यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम कुरेशी, मीडिया प्रभारी आमीर शेख, कार्तिक नागपुरे, सुंदरसिंह बावरे, सुरज जुमनाके, ओम पारखी, विशाल नागपुरे, अमरसिंह बावरे, विजय आत्राम, लक्ष्मण देवगडे, शंकर गोचे, सुनील खोंडे, अनिल बोडाने व समस्त गावकरी उपस्थित होते.

