क्रिडा क्षेत्रात तालुक्याचा नावलौकिक करा:भाग्यश्री आत्राम

0
49

जिवनगट्टा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

एटापल्ली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

एटापल्ली:-तालुक्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्रीडा कौशल्य असून प्रत्येक खेळामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करताना दिसून येतात.क्रिकेट,कबड्डी,खो-खो,व्हॅलीबॉल सारख्या खेळात मैदान गाजविण्याची ताकत असून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन तालुक्याचा नावलौकिक करा असे आवाहन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जिवनगट्टा येथे आय बी रिटन्स क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यावेळी उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सदस्य बेबीताई नरोटे,नगर पंचायतचे गटनेते जितेंद्र टिकले,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,पोलीस पाटील संभाजी हिचामी,जेष्ठ नागरिक रेनूजी हिचामी,नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती किसन हिचामी,नगरसेवक निजाम पेंदाम,भूमिया फकरीजी हिचामी,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,कैलास कोरेत,संदीप वैरागडे,अजय पदा, संतोष पदा,दसरू मट्टामी, परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना एटापल्ली तालुका हा पूर्वीपासूनच क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असून येथील तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात पुढे जायचे असेल तर अश्याच प्रकारे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे.मोठ्या स्पर्धेच्या आयोजनामुळे शहरातील उत्कृष्ट खेळाडू याठिकाणी येतील आणि त्यांच्याकडून आपल्याला चांगला खेळ कसा करायचा हे शिकता येते.खेळ कुठलाही असो त्यात सातत्य असणे गरजेचे आहे.त्यामुळे आपल्याला आवड असलेला खेळ नियमित खेळत चला.खेळामुळे अनेक फायदे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

जिवनगट्टा सारख्या गावात पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धेसाठी ५१ हजार,३१ हजार आणि २१ हजार असे अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय पारितोषिक ठेवण्यात आल्याने विविध भागातून क्रिकेट चमुनीं मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.दरम्यान भाग्यश्री ताई आत्राम यांचे गावात आगमन होताच पारंपरिक गोंडी नृत्य व ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.चिमुकल्यांनी उपस्थितांना गोंडी नृत्याने मंत्रमुग्ध केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here