सिंदेवाही येथे जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्य कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन

0
104

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था, अलर्ट इंडिया मुंबई व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी २०२४ ला जागतिक कुष्ठरोग दिवसाच्या निमित्याने करू कुष्ठरोग कलंकाचे निर्मूलन, देऊ प्रतिष्ठेला आलिंगण या नुसार ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथून रॅली चे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. ताजने वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही, महादेव चौधरी सदस्य सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड, विशाल ढोले वैद्यकीय सहाय्यक, प्रकाश मामीडवार कुष्ठरोग तंत्रज्ञ, झामदेवजी कोठेवार सदस्य ,शत्रुघ्न चौधरी सदस्य, मिलिंद बारसिंगे कोषाध्यक्ष, यांची उपस्थिती होती. .

कार्यक्रमाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.डॉ. ताजने यांनी कुष्ठांतेय संस्थेबाबत गौरवोद्गार काढून संस्थेच्या कार्याची प्रशंशा केली. कुणीही कुष्ठांतेयांसोबत भेदभाव, घृणा करू नये, शिवाय कुष्ठारोगाबाबत काही प्रश्न असल्यास प्रत्यक्ष भेटून दूर करण्याचे प्रयत्न करणार असे मनोगत व्यक्त केले.
मामीडवार यांनी कुष्ठांतेयांच्या सहभागाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच महादेव चौधरी यांनी कुष्ठांतेय यांनी लोकामध्ये येऊनच भेदभाव घृणा कमी होऊ शकते, तसेच संस्थेच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम कुष्ठांतेय यांनी अजून भव्य दिव्य करावा यासाठी सर्व कुष्ठांतेय एकत्र येऊन सहकार्य करावे असे अपील यावेळी करण्यात आले.

यादरम्यान कुष्ठांतेय यांचे बचत गट स्थापन करून गटातील कुष्ठांतेयांना आर्थिक गरज भागविणारे दुर्योधनजी रामटेके यांच्या सत्कार तसेच सुरळीत व्यवसायाभिमुख असलेल्या अनुराधा सोनकर यांचा सत्कार करण्यात आला.रॅली ही ग्रामीण रुग्णालय ते बाजार चौक तसेच रामनगर चौकातून काढण्यात आली. संपुर्ण सिंदेवाही शहर कुष्ठरोग विषयक नाऱ्यानी व गाण्यानी दुमदुमले. रॅलीचा ग्रामीण रुग्णालय येथे समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन संदीप माटे, प्रास्ताविक मिलिंद बारसिंगे यांनी केले तर आभार अश्विनी नन्नावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते करिता सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे श्रावण हांडेकर, नारायण उरकुडे, विनोद डोंगरवार, विद्या कांबळी, लता दांडेकर तसेच अलर्ट इंडिया मुंबई चे शरद निकुरे, कविता रामटेके, दिवाकर सोनबावणे, युवराज शेंडे, राजेश गड्डमवार, वैशाली देशमुख, कविता बारसागडे, तुषार नागदेवते यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here