श्री.गुरुदेव युवा क्रीडा मंडळ, टेकरी (वानेरी) यांच्या सौजन्याने रणसंग्राम कबड्डीचा आयोजन.
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही- दि.३० जानेवारी २०२४ मकरसंक्रांत च्या शुभपर्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर गावातील एक समूहाने एकत्रित येऊन युवावर्गानी श्री गुरुदेव युवा क्रीडा मंडळ,टेकरी (वानेरी) यांचे सौजन्याने रण संग्राम कबड्डीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कबड्डी स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांनी उपस्थिती राहून
युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,कबड्डी हा खेळ मैदानी खेळ असून सांघिक खेळ आहे.अगोदर मी सुद्धा कबड्डी हा खेळ आवडीने खेळायचा, माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये रनिंग व कबड्डी हाच खेळ आवडता होता.स्पर्धा म्हटले की विजय,पराजय होणे साहजिक आहे,पराजय जरी झाला असेल तर नाराज न होता पुढे प्रयत्न करावे.कबड्डीचा हा सांघिक खेळ असल्याने एकतेने एकात्मता भावनेने खेळ खेळावे असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
पुढे बोलतांना खा.नेते यांनी म्हटले या कबड्डी च्या उद्घाटनाला मला येण्यासाठी वारंवार फोन येत होता.पण मी नागपूर ला खासदार औद्योगिक महोत्सव या कार्यक्रमाला गेल्याने येऊ शकलो नाही.यात थोडे आमचे अतुल भाऊ सुद्धा नाराज झाले.यावेळी मी दिलगिरी व्यक्त करतो. तरीपण मी त्यांना सांगितलं होत कि एक तरी दिवस मी या कबड्डी सामन्याच्या कार्यक्रमाला येईल.त्यामुळे आज मी या ठिकाणी आलो आपली भेट झाली दर्शन झाले.या निमित्याने गावातील समस्या बाबत मला अडीअडचणी सांगितल्या, निश्चितच सोडण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासित करतो.सामन्याच्या शुभेच्छा देतो.अतिशय चांगल्या तऱ्हेने आपण हा कार्यक्रम पार पडला.
असे वक्तव्य खा.नेते यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. गुरुदेव युवा क्रीडा मंडळाने खासदार अशोक नेते यांचे शाल श्रीफळ, राष्ट्र संताच्या विचारधारेची ग्रामगीता व भगवी टोली देत श्री. गुरूदेव भक्त मंडळाने स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार तथा विधानसभा प्रमुख प्रा.अतुलभाऊ देशकर,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कमलाकर शिदमशेट्टीवार, देवा मंडलवार,तसेच मोठया संख्येने युवा वर्ग उपस्थिती होते.

