ना-बालक बनले चालक ; वय वर्षे 18 च्या आतील चालकांवर कारवाई करा- हाळी-हंडरगुळीकरांची मागणी

0
187

लवकरच कारवाई करणार – सपोनी भिमराव गायकवाड.

विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी

उदगीर- अल्यवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई संबंधित अधिकारी करत असतात.ते पण मोठ मोठ्या शहरात उदा: लातुर, उदगीर इ. ठिकाणी पण लवकरच तालुका होऊ शकणा-या हाळी-हंडरगुळी या गावा मध्ये आजवर ना RTO ने कारवाई केली. ना पोलिसांनी यामुळे या गावी शेकडो ना-बालक चालक बनलेले व दुचाकीसह चारचाकी गाड्या बेफाम पळवताना दिसतात.

परिणामी लहान बच्चेकंपनीसह वयस्करांच्या जिवाला धोका या बेलगाम चालकांमुळे निर्मान आहे.आणि म्हणुन वय वर्षे 18 च्या आतील सर्व वाहनचालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा या नाबालकांमुळे एखादा अपघात होऊ शकतो.म्हणुन सुसाटपणे गाड्या पळविणा-या नाबालकांवर तसेच विनानंबरची वाहने,विनाकागदपञाचे वाहने चालवणा-यावर व मोबाईलवर हाय, हॅलो म्हणत गाडी चालवणा-या व्यक्तीवर तसेच बालकांना मोठ्या शाहीथाटात गाडी चालवायला देणारे पालकांवर पण लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे,अशी माहिती सदर प्रतिनिधीशी बोलताना कर्तव्य – दक्ष सपोनी.भिमराव गायकवाड यांनी दिली आहे.तसेच याबाबत जन जाग्रतीसाठी गावभागात भोंग्याद्वारे सांगणार आणि मग कायद्याचा पट्टा उगारणार आहे.अशी माहिती दबंग पोहेकाॅ. संजय दळवे-पाटील म्हणाले. मिसुरडंही न फुटलेली अल्पवयीन पोरं बाईक चालविताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.ते ही फक्त शहरातच ग्रामीण भागात म्हणजे हाळी परिसरात आजवर अशा एकाही अल्पवयीन चालकांवर व त्यांच्या बापांवर एकदा ही कारवाई करायची कुणी डेअरींगच केली नाही.कारण येथील बहूतांश अल्पवयीन चालक हे “गब्बर” घरचे आहेत ! म्हणुनच हाळीहंडरगुळी या गावात रोज 100 एक अल्पवयीन पोरं डबल,ट्रीपलसीट बाईक सुसाट वेगात स्व:तासह इतरांचाही जीव हा धोक्यात घालुन गाड्या पळविताना दिसतात.शहरात जसे आरटीओद्वारे अशा बालकांवर कारवाई होते.अगदी तशीच कारवाई हाळी येथे करावी.ही जनतेची मागणी आहे.वय अठरा वर्षा खालील मुले हे गाड्या चालविण्यास पाञ नसतात. त्यांचे लायस्नंस नसते. व त्यांना वाहतुक नियमांची माहिती नसते.मोटार वाहन कायदा कलम 199 (अ) अंतर्गत पालकांना तीन वर्षापर्यंत कारावास व 25 हजारांचा दंड होऊ शकतो.अशी मोटार वाहन कायद्यात तरतूद आहे.तसेच लहान असलेल्या पण वाहन चालवताना पकडलेल्या अल्पवयीन पोरांना 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळत नाही.अन् नाबालक चालवत असलेले वाहन जर आरटीओ वा पोलिसांच्या तावडी मध्ये सापडले तर त्या गाडीची नोंदणी 12 महिण्यांसाठी रद्द होऊ शकते.. तसेच अल्पवयीन मुलांना वाहन देणे त्याच्या आयुष्यासाठी धोकादायक आहे.व मोटार वाहन कायद्यानुसार 25 हजार दंड व पालकालाही सजा होऊ शकते.लातुर जिह्यातील हाळी वगळता गत बारा महिण्यात चाळीस जणांवर कारवाई केली असुन त्यांच्या कडून जवळपास चार लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.माञ या गावात आजवर कारवाई करायची धमक कुणीच दाखविली नाही.म्हणुन हाळी-हंडरगुळीत शंभरएक बालके हे डबलसह ट्रिपल व चारसिट बसवुन दुचाकी वाहने सुसाट पळवताना दिसतात.तेंव्हा अल्पवयीन चालकांना आवर घालणे व त्यांचेवर पालकांसह कारवाई करणे गरजेचे आहे.अशी चर्चा हाळी-हंडरगुळीत होत आहे.तर अल्पवयीन चालकांसह पालकांवर व फोनवर बोलताना व विना लायसन्स व विनानंबरची गाडी चालविणा-यास कायद्यान्वये कारवाई करणार आहोत अशी माहिती कर्तबगार सपोनी, मा. भिमराव गायकवाड,जमादार संजय दळवे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here