सुजात आंबेडकर यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कडून स्वागत

0
558

निशा सोनवणे
कोकण वि. संपादक
प्रबोधिनी न्युज

संपूर्ण मुंबई मध्ये जन संवाद यात्रा चालू असताना आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्रातील राजकारणातले केंद्रबिंदू माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव, राजगृह चे युवराज मा.सूजात दादा आंबेडकर साहेब यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून अभिवादन करून जनतेची थेट भेट देण्यात आले.
सुजात आंबेडकर यांनी गोर गरीब जनतेची समस्या जाणून घेतली व SRA प्रकल्प, KG To PG शिक्षण, उद्योग, अमली पदार्थ वर बंदी,पोलिस वसाहत चे बिल्डिंग चे लिकेज, BEST वीज पुन्हा मुंबई मध्ये यावी, या विषयावर संपूर्ण लक्ष देऊन जनतेला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करणं आहेत, असे जन संवाद यात्रा मध्ये सांगण्यात आले. तसेच प्रमुख उपस्थिती. सुरेश मोहिते महाराष्ट्र सरचिटणीस, सुनील लोखंडे मुंबई सचिव, प्रदीप गौतम साळवे घाटकोपर तालुका अध्यक्ष, विनोद नरवाडे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख सोशल मीडिया, सचिन केदारे तालुका सहसचिव, मुकेश रामदास लिहिणार तालुका सरचिटणीस, राहुल साळवे तालुका सचिव, मनोज जाधव, नथुराम कांबळे तालुका संघटक, आशिष कांबळे तालुका निरक्षक, सिद्धार्थ अस्वारे तालुका महासचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा १३३ सर्व सर्व पदाधिकारी, सुरज गिरी कामराज नगर रिक्षा चालक-मालक अध्यक्ष, बजरंग तुपे माता रमाबाई आंबेडकर नगर रिक्षा चालक-मालक अध्यक्ष, व माता रमाबाई आंबेडकर नगरातील वरिष्ठ नेतेमंडळी, समाजसेवक, महिला मंडळ, सर्व कार्यकारणी व पदाधिकारी शेकडो संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here