प्रणित तोडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर- दिनांक 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई यांची जयंती भीम आर्मी जिल्हा संघटिका विशाखाताई आमटे यांच्या नेतृत्वात रैयतवारी शाखा प्रमुख रेखा धोटे, उप प्रमुख छबिताताई धोटे, सुनीता जोंधडे, उज्वला कांबळे, पौर्णिमा रामटेके, सुनंदा धोटे, कोमल गावंडे यांच्या उपस्थितीत मोठ्या हर्ष उल्हासात केक कापून जलेबी व खीर दान करून साजरी करण्यात आली.
भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन प्रतिमेस माल्यार्पण करून माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकले व मार्गदर्शन केले, निलेश भाऊ ठाकरे यांनी पण शुभेच्छा प्रति मार्गदर्शन केले व विशाखा ताई आमटे यांनी आपल्या गोड आवाजाने गीतगाऊन सर्वांचे मन जिंकले.
प्रसंगिक महाकाली वार्ड शाखा अध्यक्ष सागर दुर्गे व त्यांची टीम उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली.

