प्रणय बसेशंकर
तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज़
चंद्रपूर:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर, जिल्हा क्रीडा परिषद , नागपूर व नागपूर शहर महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय स्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्धा जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे घेण्यात आले होते. यात चंद्रपूर सिकाई मार्शल आर्ट असोसिएशन चंद्रपूरची विद्यार्थिनी एलीन राकेश सुनार १४ वर्षा आतील -३१ किलो खालील मुली वजन गटात विजय पद प्राप्त करून राज्य स्तराकरिता आपले नाव नोंदविले.
संस्थेचे अध्यक्ष मान. तारेंद्र पुरुषोत्तम शेजपाल सचिव संतोष रतन कडपेवाले यांनी विद्यार्थिनींला शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस यांनी देखील विद्यार्थिनीच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

