आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
टाकळी किटे.. रस्त्याच्या मदात हरीण आडवे आल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला तर हरीण जाग्यावर ठार झाले. ही घटना टाकळी किटे येथे साडे आठ वाजता घडली कानतीलाल अनिल भोसले वय 35 रा.चारमंडळ असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे मिळालेल्या माहिती नुसार कांनतीलाल भोसले हे MH326093 या क्रमांकाच्या दुचाकीने चारमंडळ वरून सुकळी स्टेशन मार्गे मदनी दिंदोळा येथे कामा निमित्य जात होते दरम्यान टाकळी किटे येथे अचानक त्यांच्या दुचाकी समोर हरीण आडवे आले व त्यांची दुचाकीची हरणाच्या अंगावर जाऊन धडकी ही धडक इतकी जबर होती की यात हरीण जाग्यावर ठार झाले व दुचाकी चालक हे गंभीर जखमी झाले तसेच सामाजिक कार्यकर्ता रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटना स्थळी जाऊन जखमीला आपल्या रुग्णवाहिकेत सेवाग्राम येथे उपचारा साठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार करून डोक्याला व ब्रॅन्ड ला जबर मार असल्या मुळे सावंगी मेघे रुग्णालय येथे उपचारा साठी पाठविले पुढील तपास सेलू पोलीस स्टेशन चे निरीक्षक तिरुपती राणे साहेब करीत आहे.

