
वंचित बहुजन आघाडी मागणी
जुन्नर प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
जुन्नर- ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेृत्वाखालील महाराष्ट्र मध्ये होणारे अन्य विरुद्ध लढा देण्यासाठी मा.राज यशवंत कुमार (पुणे जिल्हा अध्यक्ष) यांच्या आदेश अनुसार निमगाव सावा या गाव चे भूमिपुत्र सुनील शांतीलाल भळगट यांनी दिनांक २७/०७/२०२३ रोजी उपाधीक्षक भूमि अभिलेख जुन्नर मंगल गवळी यांना तक्रारी अर्ज दिला व दोन्ही मोजणीची चौकशी केल्याशिवाय क प्रत देण्यात येऊ नये याबाबत सुनील शांतीलाल भळगट यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख जुन्नर मंगल गवळी यांची वेळोवेळी भेट घेऊन विनंती केली असून फक्त आणि फक्त उडवाउडवीचे उत्तर दिले जात होते. माहितीच्या अधिकारांतर्गत आरटीआय च्या माध्यमातून पत्र व्यवहार करून. प्रथम अपील करूनही सुद्धा कोणत्याही पत्राचं योग्य ते उत्तर आले नाही. उपअधीक्षक यांच्या जाणीपूर्वक चुकीचा केलेली मोजणी ही दोन समाजामध्ये मारामारी होऊन दोन्ही समाजावर गुन्हा दाखल होऊन आज कोर्ट मध्ये केस चालू आहे . साहेब सर्वे पुरावे असताना देखील चुकीची घटना होत असताना भूमी अभिलेख उप अधीक्षक मंगल गवळी यांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे पंकज सरोदे (तालुका उपाध्यक्ष) यांनी केले व रवींद्र चौधरी (dysp) यांनी आश्वासन देण्यात आले की लवकरात लवकर तातडी ने चौकशी करून योग्य ती कारवाही करण्यात येईल असे आश्वासन कार्यकर्ते यांना देले.
उपस्थित असलेले कार्यकर्ते पंकज भाऊ सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष),नसिफ भाई शेख(आंबेगाव तालुका संघटक), संगीता मिरके (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), सुरिया शेख (निमगाव सावा शाखा अध्यक्ष), वैशालीताई खुडे (जुन्नर तालुका महिला संघटक), प्रदीप गौतम साळवे (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन-निरीक्षक) उपस्थित होते.














