prabodhini news logo
Home चंद्रपूर नवरगाव येथील श्री.ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुरेश बाकरे सेवानिवृत्त

नवरगाव येथील श्री.ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुरेश बाकरे सेवानिवृत्त

0
259

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

अत्यंत दुर्गम भागात 1968 ला श्री ज्ञानेश महाविद्यालयाची स्थापना झाली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून अद्यावत शिक्षण मिळावे यासाठी धडपडणारे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे हे निवृत्त झाले. भारतीय शिक्षण संस्था व महाविद्यालयाचा स्टाफ कौन्सिल यांच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्ष जयंत बोरकर हे होते. भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद बोरकर तसेच नागपूर येथील प्राणी शास्त्राचे अभ्यासक डॉ. बारसागडे, डॉ. अँड्र्यू आणि डॉ. गाडेगोणे हे विशेष करून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ कौन्सिलचे सेक्रेटरी डॉ.आस्तिक मुंगमोडे यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ.उजेडे उपस्थित होते.यावेळी बोलताना त्यांच्या प्रति अनेकांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

“महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर 10 वर्षाची कारकीर्द प्राचार्य म्हणून त्यांनी निभावली. एकूण 41 वर्ष सेवा त्यांनी श्री ज्ञानेश महाविद्यालयाला दिलेली दिलेली आहे.
प्राचार्य म्हणून मागील दहा वर्षापासून महाविद्यालयाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांनी अत्यंत तळमळीने आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्यासोबत भारतीय शिक्षण संस्था भक्कमपणे उभी होती” असे सदानंद बोरकर हे बोलले.
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना मोकळ्या केल्या.
प्रत्येक कर्मचाऱ्यांशी आपला व्यवहार हा महाविद्यालयाचे हित केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेला आहे.
त्यांच्या प्रशासकीय दहा वर्षाच्या कारकिर्दीत कामाचे मोल जाणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सत्र 2019-20 मधील सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीत महाविद्यालयाचे दोन वेळा NAAC मूल्यांकन झाले. दुसऱ्या NAAC पुनर्मुल्यांकनात श्री. ज्ञानेश महाविद्यालयाला A दर्जा प्राप्त झाला हे त्यांच्या कामाची सर्वोच्च पावती होती.
महाविद्यालयाच्या एकूणच उभारणीत बाकरे सरांच्या कारकीर्दीचा नक्कीच ठसा उमटलेला जाणवतो. मागील दहा वर्षात विविध विषयाचे चर्चासत्र परिसंवाद आणि परिषदा आयोजित करण्यात आले. ज्यामुळे श्री ज्ञानेश महाविद्यालयाचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला.त्यांच्या सकारात्मक प्रयत्नातून कला व विज्ञान शाखेत विविध आठ विषयांमध्ये पदव्युत्तर विभाग सुरू झाले,ग्रामीण विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधन करता यावे या भूमिकेतून महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरू झाले, सोबतच महाविद्यालयाचा भौतिक चेहरा बदलवणाऱ्या अनेक गोष्टी या काळात उभ्या केल्यात. ज्यात पसायदान हे भव्यसभागृह, विज्ञानाच्या अद्यावत प्रयोगशाळा, कॉन्फरन्सरूम, सौरऊर्जा प्रणाली, महाविद्यालयाचे अंतर्गत गट्टू अच्छादित प्रांगण, वनस्पतीशास्त्राचे उद्यान, महाविद्यालयाच्या पक्क्या वर्ग खोल्या आणि फर्निचर, महाविद्यालयाचे संगणक प्रणालीद्वारे अद्यावत केलेले कार्यालय , विविध विषयाच्या विभाग प्रमुखांना दिलेले संगणक व इंटरनेट जोडणी सह कॅबिन असे कितीतरी अभूतपूर्व कार्य आपण अत्यंत वेगाने महाविद्यालयाची भरभराट त्यांनी केली. “जबाबदारीतून रचनात्मक उभारणी” हा अत्यंत गौरवशाली आदर्शाचा वस्तुपाठ आपल्या कार्यातून बाकरे सरांनी ठेवला आहे. त्यांच्या कार्यकाळात वाढत जाणारी विद्यार्थीसंख्या तसेच विद्यार्थी व पालक यांचा महाविद्यालयांवर वाढत असणारा लोभ ही त्यांच्या काळाची जमेची बाजू आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंत बोरकर यांनी शुभेच्छा देताना ” महाविद्यालयाच्या उज्वल भविष्यासाठी आपले प्रशासकीय नेतृत्व निश्चितपणे एक इतिहास घडला आहे. प्राचार्य म्हणून आपली उत्साहवर्धक कार्यशैली, आपल्यातील रचनात्मक प्रशासक, संवेदनशील शिक्षक व संशोधक, श्री. ज्ञानेश महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी राहील.” असे म्हंटले. कार्यक्रमाचे आभार स्वप्निल बोरकर यांनी मानले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गजानन कोर्तलवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here