prabodhini news logo
Home चंद्रपूर बेलपातळी येथे ग्रामीण रात्रकालिन हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बेलपातळी येथे ग्रामीण रात्रकालिन हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
345

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

तालुक्यातील बेलपातळी येथे शिवाजी राजे क्रिकेट क्लब बेलपातळी यांच्या सौजन्याने क्रिकेटप्रेमिंसाठी बिसनजी बगमारे यांच्या भव्य आवारात ग्रामीण रात्रकालिन हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून *या क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकमत चंद्रपूर जिल्हा भुषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.*_
_कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर उपस्थित होते. उपाध्यक्ष म्हणून उत्तम बनकर ग्रा.पं. सदस्य रुई, सहउद्घाटक म्हणून मनोहर भर्रे उपसरपंच रुई उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून कल्पनाताई तुपट सरपंच रुई, जक्कनवार सर बेलपातळी, रमेश गुरणुले, धनराज मेश्राम, मारोती ठाकरे, केशव बावणे, अक्षय शिवूरकर, सदाशिव देशमुख, राजिराम राऊत, ज्ञानेश्वर ठाकरे, रामेश्वर ठाकरे, पार्वताबई राऊत, मंसाराम कामडी व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते._
_या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धा महत्वाचा आहेत कारण स्पर्धांच्या विविधतेने गावाच्या समाजातील लोकांना एकत्रित करते, क्रिकेट सारख्या खेळाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता, मानसिक स्थिरता, टीम वर्क करण्याची क्षमता आणि सामाजिक संवादाची क्षमता वाढते. या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागात एकोपा निर्माण होत असतो. तरुणांमध्ये नवचेतना व उल्हास निर्माण करणारी ठरत असते. ग्रामीण क्षेत्रात क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आणि त्यात सहभागी व्हायला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शिवाजी राजे क्रिकेट क्लब बेलपातळी यांच्या सौजन्याने आयोजित ग्रामीण रात्रकालिन हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमधे तालुक्यातील अनेक गावातील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here