prabodhini news logo
Home ठळक बातम्या शेकडो भटक्या व विमुक्त जातींच्या नागरिकांना मिळाले दाखले

शेकडो भटक्या व विमुक्त जातींच्या नागरिकांना मिळाले दाखले

0
85

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील पवनचक, पळसगाव जाट, कळमगाव गन्ना, नवरगाव येथे भटक्या व विमुक्त जातींच्या नागरिकांसाठी तहसील कार्यालयामार्फत दि. 04 आणि 05 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, मतदान कार्ड इ. चे वितरण करण्यात आले होते. त्यामुळे सदर शिबिरात शेकडो भटक्या व विमुक्त जातींच्या नागरिकांना दाखले मिळाले.या शिबिराला गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी तहसीलदार संदीप पानमंद ,नायब तहसीलदार मंगेश तुमराम,हेमंत तेलंग , प्रवीण गावंडे, आणि सिंदेवाही तहसील कार्यालयाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here