कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे जागतीक महीला दीन साजरा करण्याचा आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीप प्रज्वलित करुन केले.त्या नंतर महाविद्यालयातील महिला शिक्षका व कर्मचारी वर्गाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी अध्यक्षीय भाषणात स्त्रियांची अस्मिता जागृत करून त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली तसेच शैक्षणिक क्षेत्रात स्त्रियांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका कु.चेतना अगळे यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणात भारतीय समाजात स्त्रियांचा इतिहास सांगून स्त्री चळवळीत महिला सामाजिक कार्यकर्त्याचे योगदानाबद्दल त्यांचे गुण गौरव केले व महिलांना अबला ते सबला नारी बनण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करून आपल्या सामाजिक अधिकाराची जाणीव करून दिली. विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निराशा बोरकर यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले. याप्रसंगी महाविद्यालयातील महीला कर्मचारी रुपा बोरकर, अनुप्रिया फुलबांधे, चेतना अगळे, तरूणाई मुन, शुभांगी मानकर यांचा पूष्पगूच्छ देऊन विध्यार्थी यांनी गौरव केला. याप्रसंगी डॉ नागलवाडे समन्वयक अधिकारी रासेयो, प्रा.अमित उके, ग्रंथपाल अनुप्रिता फुलबांधे.प्रा. कु रूपा बोरकर, श्रीमती तरूताई मून, शुभांगी मानकर, प्रा.तुकाराम बोरकर, प्रा.गभने,प्रा. रणदिवे, प्रा.आडे, प्रा. राठोड,प्रा. त्रिपदे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील विद्यार्थी सौरव परसावर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा मेंडुलकर आणि आभार प्रदर्शन श्रेया सदनपवार यांनी केले

