गणेशपुर येथे समाज मंदीर भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

0
33

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून १२.४५ लाख रुपयांचा निधी मंजूर

रविन्द्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

ब्रम्हपुरी – तालुक्यातील गणेशपुर येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४ योजनेअंतर्गत नाट्यसभामंच परिसरात सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दिनांक ९ मार्च २०२४ रोजी संपन्न झाले. ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विकासपुरुष विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून गणेशपुर येथे नाट्यसभामंच परिसरात सभागृह बांधकामासाठी १२.४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.
यावेळी प्रामुख्याने ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा सौ मंगलाताई लोनबले, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ भावनाताई ईरपाते, चंद्रपूर जिल्हा महिला कॉग्रेस जिल्हा महसचिव श्रीमती नयनाताई गुरनुले, ग्रामपंचायत सदस्या सौ पार्वता मानकर, ग्रामपंचायत सदस्या सौ रेष्माताई वसाके, माजी सरपंच शंकरराव मानकर, काँग्रेस कार्यकर्ते भास्कर राउत, जगदीश ठाकरे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here