गणेश कलिंगडा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त खोडाळा येथील मायरा क्लिनिक येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले, जेष्ठ नेते प्रल्हाद काका कदम, डॉ मिठाराम कडव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तपासणी करून घेतली पाहिजे, महिला डॉक्टर वर्षा घोडेराव यांच्या प्रयत्नातून हि गोष्ट शक्य झाली आहे असे प्रतिपादन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
खोडाळा पंचक्रोशीतील शेकडो महिला आरोग्य तपासणी शिबिराला येऊन तपासणी करून घेतली, मोफत औषधोपचार देखील करण्यात आले.
नाशिक येथील तज्ञ डॉक्टर यांनी तपासणी केली.
या प्रसंगी प्रदीप वाघ उपसभापती, कुसुम झोले जिल्हा परिषद सदस्या, प्रल्हाद काका कदम, डॉ मिठाराम कडव, आशा झुगरे पंचायत समिती सदस्य, मिलिंद झोले, निलेश झुगरे,लता वारे सरपंच, गीता पाटील सरपंच, योगेश दाते सरपंच, प्रमिला भागडे सरपंच, सुलोचना गारे, सरपंच, नंदकुमार वाघ उपसरपंच, मोहन मोडक उपसरपंच, मंगेश दाते, संजय वाघ, गणेश खादे उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन मायरा क्लिनिक च्या डॉ वर्षा घोडेराव यांनी केले होते.

