गणेश कलिंगडा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील सुमारे १०१ शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम भाजप ने केला आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार निधी अंतर्गत दोन वर्षात सुमारे ५ कोटीहून अधिक खर्च करण्यात आला.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आदिवासी भागातील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात यावा या साठी विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. हेमंतजी सवरा यांच्या प्रयत्नाने जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील ३५ शाळांना अंदाजे प्रत्येकी ५ लक्ष रू चे डिजिटल शाळा किट चे वाटप करण्यात आले. या मध्ये मोखाडा तालुक्यातील वाशाळा, खोच, डोलारा, मोऱ्हांडा, बेरिस्ते, किनिस्ते, खोडाळा, सूर्यमाळ, सायदे, शाळांचा समावेश तालुका अध्यक्ष संतोष चोथे व आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले यांच्या माध्यमातून करण्यात आला.या प्रसंगी भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, ज्येष्ठ नेते हरिश्चन्द्र भोये, मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे, OBC आघाडी जिल्हाध्यक्ष महेश आळशी, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले, विक्रमगड तालुका अध्यक्ष दिपक पावडे, सरचिटणीस ज्योती ताई भोये, राजेंद्र पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

