गणेश कलिंगडा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
जव्हार तालुक्यातील पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी ही एकमेव पालघर जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढी असुन ग्रामीण भागातील रुग्णांना एक वरदान ठरत असुन आज जव्हार तालुक्यातील खंबाळा-तलासरी ग्रामपंचायत पैकी तलासरी या गावातील कैलास डबाळी वय वर्ष २६ या रुग्णांला A+ पोजेटीव्ह रक्ताची अत्यंत तातडीचे अर्जंट गरज रुग्णांला त्याच्या शरीरात रक्त कमी असल्याने त्याला पुढील उपचारा करिता A+ पॉझिटिव्ह अत्यंत रक्ताची गरज असल्याची माहिती खंबाळा-तलासरी ग्रामपंचायतचे सरपंच नितीन पाटील व युवा आदिवासी संघाचे माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी युवा आदिवासी संघ रक्तदान गृपच्या माध्यमातून युवा रक्तदात्यांना आवाहन केले असता ना पतगशहा कुटीर रुग्णालयात सम्पर्क करा असा काम मेसेज सोशल मीडियाची माहिती मिळतात युवा आदिवासी संघ जव्हार गृपचे सदस्य कैलास कुरकुटे यांनी स्वतः रक्तपेढी येऊन एक पिशवी रक्तदान करून सदर रुग्णांना मददत केली.जव्हार तालुका दुर्गम असून अनेक सुखसोई पासून वंचित आहे अशात अनेक अडचणी आहेत पण यावर मात करत अनेक युवा यात नेहमीच सहकार्य करीत असतात त्यातील एक महत्वाची घटना गेल्या ४ दिवसा पासून एक (sms) सर्व ग्रूप वर फिरत होता शक्य तो कधी अशी घटना घडीत नाही. तलासरी गावातील कैलास डबाळी या रुग्ण होता त्यांना A+ रक्तगट ची गरज होती बहुतेक क्रिकेट सामने असल्याने महिला दीन व महाशिवरात्री असल्याने या (sms) कुणाचे लक्ष गेले असेल जेव्हा हा (sms) कैलासजी कुरकुटे यांनी पाहता क्षणी महाशिवरात्री यात्रेला न जाता जव्हार कॉटेज हॉस्पिटल मध्ये जाऊन पाहिले रक्तदान करून आले. रुग्णांकडून देवासारखे धाऊन आलात असे म्हणत असताना कैलासजी कुरकुटे म्हणाले आपण या समाजात आहोत समाजाचं आपल्याला देणं लागत गरजवंताला मदत करणे हे प्रत्येक युवाचे काम आहे.याबाबत त्याचे सामाजिक दायित्व बघून या कैलास कुरकुटे या रक्तदात्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे व कौतुक होत आहे. तसेच सदर युवा आदिवासी संघ रक्तदाता गृप एक हात मद्यतीचा उद्देशाने तयार करण्यात आला असून हा उद्देश सफल होत असल्याचे सर्वच गृप मधील सभासद कडून बोलले जात आहे.

