मिनघरी येथे मॅरॅथॉन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
प्रचंड उत्साह, तरुणाईचा जल्लोष अशा वातावरणात पहिल्यांदाच सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथे घेण्यात आलेल्या “मिनघरी मॅरेथॉन २०२४” स्पर्धेत विविध जिल्ह्यातून आलेल्या १०० स्पर्धकांनी धाव घेतली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
सावित्रीबाई फुले वाचनालय मिनघरी ते रामाळा मार्गे सिंदेवाही रोड असा स्पर्धेचा मार्ग होता.
स्पर्धा पुरुष गट १० किमी. व महीला गट ५ किमी. या प्रकारात झाली. स्पर्धेला सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला.
यवतमाळ,नागपूर,सावनेर,भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर, वणी,गोंदिया, अश्या विविध ठिकाणांहून आलेले स्पर्धक धावले. यामध्ये पुरुष गटात शिवाजी गोस्वामी चंद्रपूर याने ३१.२२ मिनिटात १० किमी चे अंतर पार करत प्रथम पारितोषिक मिळवले. तर नागेश्वर रस्से चामोर्शी याने ३२.५९ मिनिटात अंतर पार करत द्वितीय पारितोषिक मिळवले. क्रिश मिस्त्री यवतमाळ , सूरज बोटरे घोट, रीतिक शेंडे चंद्रपूर यांनी अनुक्रमे तिसरे, चवथे व पाचवे स्थान प्राप्त केले. तर महिला गटात अवघ्या १३ वर्षाची उमरेड येथील श्रावणी खोब्रागडे हिने सर्वांना मागे टाकून १९.४१ मिनिटात ५ किमी. अंतर पार करून प्रथम पारितोषिक मिळवले. तर द्वितीय क्रमांक अभिलाषा लगन चंद्रपूर हिने २०.०१ मिनिटात अंतर पार करून पारितोषक मिळवले.
तेजस्विनी कामडे चंद्रपूर, अंजली मडावी नागपूर, दुर्गा धारणे सिंदेवाही यांनी अनुक्रमे तिसरे,चवथे, व पाचवे स्थान प्राप्त केले. विजेत्यांना शिल्ड प्रमाणपत्र व बक्षिसाची रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन आमचा गाव आमचा विकास समिती मिनघरी यांनी केलं होते.

