जव्हार पतंग शाह कुटीर रुग्णालय येथे डायलेसिस सेंटरचे उद्घाटन..

0
35

गणेश कलिंगडा
पालघर जिल्हा प्रतिनिधी

जव्हार : जव्हार नगरीतील पतंग शाह कुटीर रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गम,आदिवासी भाग असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि डहाणू तालुक्यातील रुग्णांवर योग्यपणे उपचार करीत आले आहे. उपलब्ध सोयी सुविधा नुसार येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेची सेवा अविरतपणे चालवीत आहे, अशातच या तालुक्यातील असलेल्या ग्रामीण,भागातील डायलेसिस रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध व्हावी म्हणून रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट,कोस्ट गोरेगाव, यांच्या विद्यमाने 12 रोजी सकाळी 11 वाजता डायलेसिस सेवेचा उद्घाटन करण्यात आला.दिवंगत गंगाबाई विष्णू गोसावी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या, रोटरी पतंग शहा कुटीर रुग्णालय डायलिसिस सेंटर चा जव्हार तालुका आणि जवळपासच्या तालुक्यातील रुग्णांना मदत होणार असून, ही सेवा पूर्ण पणे मोफत असल्याचे आयोजकांनी सांगितले. केवळ डायलेसिस करिता 100 ते 300 किलोमीटर चा प्रवास खर्च करून जाणे ह्या गोष्टी आता थांबतील, स्थानिक ठिकाणी डायलेसिस सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना ही मोठा दिलासा मिळाला असून त्यानी समाधान व्यक्त केले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळालेल्या सुसज्ज अशा डायलेसिस सेंटरचा रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.या उद्घाटना प्रसंगी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, पालघर जिल्हा, शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, विक्रमगड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रशांत राजगुरू जव्हार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले, रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी ,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार,संदिप साळवे, इमरान कोतवाल, आदी उपस्थित होते.
“जव्हार तालुक्यासारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात डायलेसिस सेवा सुरू झाल्याने, येथील रुग्णांची आर्थिक बचत होऊन मोट्या प्रमाणात होणारा प्रवासाचा त्रास वाचला असून तालुक्याच्याच ठिकाणी डायलेसिस सुविधेचा लाभ घेता येणार आहे.डॉ. रामदास मराड , जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर”.
“जव्हार हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या तालुक्यातील रुग्णांना रोटरीद्वारे उभारण्यात आलेल्या डायलेसिस सेंटरमुळे मोठा आधार मिळून योग्य वेळी रुग्णांना उपचार घेण्यास फायदेशीर ठरू शकेल.भाऊसाहेब फटांगरे, अप्पर जिल्हाधिकारी,पालघर “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here