एका दिवसात जर पाच घरी गेलो तर पक्ष वाढेल – शरद मल्हारी पाईकराव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, घुग्घुस

0
18

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर – आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्ह्याचा वतीने आगामी लोकसभा निवडणूक सामोर आल्याने पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक अँड. सर्वजित बंसोड, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अँड. प्रियदर्शनी तेलंग, प्रवक्त्ये महाराष्ट्र राज्य, यांच्या उपस्थितीत पार पडली.
या शिबीरामध्ये सर्वजित बंसोड यांनी पक्ष वाढेल या साठी काय करायला पाहिजे असा प्रश्न विचारला. तर सर्व पदाधिकारी यांनी आप आपले मत व्यक्त केले.
तसेच वंचीत बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले आपण पक्ष वाढवण्यासाठी रोज जर पाच घरी जाऊन वंचित बहुजन आघाडी काय आहे. बाळासाहेब आपल्या साठी काय करत आहे. जर त्यांना पटवून दिले तर पक्ष वाढेल.
जर एका दिवसाला पाच घरी गेलो तर महिण्याला दिडशे घरी तर वर्षाला अठराशे घरी जाऊन त्यांना सांगु शकतो.
आपल्याला जनतेपर्यंत पोहचने गरजेचे आहे.
यावेळेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने, महिला जिल्हाध्यक्ष कविता गौरकर, जिल्हा महासचिव अँड. अक्षय लोहकरे जिल्हा महासचिव मधुकर उराडे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, तालुका अध्यक्षा महिला प्रतिमा तेलतुंबडे तालुका महासचिव प्रज्ञा ठमके घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष जगदीश मारबते कोषाध्यक्ष अशोक भगत व समस्त वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here