कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील पुरकेपार येथे मग्रारोहयो कामावर ८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या जागतिक महिला दिना निमित्य कार्यक्रमाचे अध्यक्ष कृपाली दडमल समतादूत बार्टी संशोधन केंद्र पूणे, प्रमुख पाहूणे म्हणून शिल्पा ढोणे, विरांगणा कुंभरे अंगणवाडी सेविका, शिल्पा मडावी मदतनिस उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष धुर्वे रोजगार सेवक रत्नापुर, संचालन पोर्णिमा चौधरी, कोमल ढोणे, यांनी केले.उपस्थित महिलांना कृपाली दडमल यांनी मार्गदर्शन केले. कामावरील सर्व मजुर कार्यक्रमाला उपस्थित होते.

