prabodhini news logo
Home लेख लेख; स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त...

लेख; स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

0
136

लेखिका
कोमल बोरकर
चंद्रपूर

एक क्रांतीची मशाल, स्त्री कर्तुत्वाची प्रेरणा, बहुजनांचे कैवारी, दिन दुबळ्यांचा महान सुर्य, समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले ज्या महान सुर्याने स्वत:च संपूर्ण जीवन इथल्या बहुजन समाजासाठी खर्ची केल, बहुजनांसाठीच नाही तर इथल्या ब्राह्मण वर्गातील स्त्रियांना लढण्याचे सामर्थ्य दिलं.स्त्री ही जरी ब्राह्मण वर्गातील असली तरीही तीला बंधने होती कारण पुरुषप्रधान संस्कृती असल्याने तीच्यावरही जुलमी अत्याचार केला जात होता. आणि या स्त्रियांना समाजात मानाच स्थान मिळावं यासाठी फुले दाम्पत्याने अथक परिश्रम केली.
1940ला जेव्हा महात्मा ज्योतीबा फुलेंच लग्न माता सावित्रीआई सोबत झाले तेव्हा ज्योतीबा 12 वर्षाचे आणि सावित्रीआई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या,
सावित्रीआई शिकल्या नव्हत्या परंतु सावित्रीला शिकण्याच धाडस होतं,
त्या लहानपणापासूच कर्तुत्वान होत्या,परंतु त्या काळामध्ये स्त्रिया शिक्षण घेण म्हणजे महापाप समजल्या जात होतं. स्त्रियांना अबला समजल्या जात होत, स्त्री शिकली म्हणजे त्या अक्षराच्या अळ्या पडतील आणि त्या मग नवऱ्याच्या ताटात पडतील अशा पद्धतीच्या जुलमी नियमांना त्यांना सामोरे जावे लागत होत, त्यांना घराबाहेर पडु देत नव्हते ,
अशा परिस्थितीत महात्मा ज्योतीबांना समजलं होत की शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही,स्त्री शिकली तर स्वतंत्र होणार, तीचे स्वतंत्र मत असणार,घरातील मुलां-मुलींना शिकवणार, स्त्री प्रगत होणार.
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरूवात स्वत:च्या घरापासुनच केली आणि सावित्रीआईला शिकवलं, समाजासाठी त्यांनी स्वत:च्या घराचा त्याग केला,त्यांच्या वडीलांनी विरोध केला, तरीही न डगमगता फुले दाम्पत्य लढण्यासाठी तत्पर झाले. हे फुले दाम्पत्य म्हणजे चंदनासारख सुंगध देणार होतं, ज्या मनुवादी संस्कृतीमुळे स्त्रिवर अत्याचार केला, स्त्रिला सती जाव लागे, नवरा मेल्यावर तीच मुंडण केल्या जात होत, तीला दुसर लग्न करण्याचा अधिकार नव्हता , अशा गुलामीत जीवन जगणाऱ्या स्त्रियांना सक्षम करणारे विचार अठराव्या शतकात एखाद्या पुरुषामध्ये असणे म्हणजे एक महान थोर विचारवंतच होय.
स्त्री ही शिकली पाहिजे, प्रगत झाली पाहिजे म्हणून 1 जानेवारी 1848ला पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीआई ह्या होत्या. शाळा ही 6 मुलींनी सुरु झाली,हळुहळु मुलींची संख्या वाढु लागली फुले दाम्पत्यांना खुप आनंद झाला, आणि त्यांची प्रेरणा वाढत गेली आणि एकापाठोपाठ एक शाळा सुरू केल्या, यामुळे मात्र मनुवादी लोकांच्या पोटात दुखायला लागलं, धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओरडु लागले, तरीही याकडे दुर्लक्ष करत फुले दाम्पत्य आपले कार्य चालू ठेवली, आणि तेव्हापासून खरी शिक्षणाची सुरुवात झाली.
हि शिक्षणाची सुरुवात करत असतांना ज्योतीबांच्या अनेक मित्रपरिवारांचा सहभाग होता.
इ. स 1849 ला उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांसाठी शाळा सुरू केली.
केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाव्ह्याचा संप घडवून आणला,
1853मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली, भृणहत्त्या टाळावी म्हणुन 1864 ला अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम चालू केलं. ज्योतीबांच हे कार्य अविरत चालू होत.
1865 ला एका काशीबाई नावाच्या बालविधवेच्या मुलाला दत्तक घेतात आणि त्याच नाव यशवंत अस ठेवण्यात येते ,त्याला डॉ बनवतात.त्यानंतर यशवंतही समाजासाठी आपले योगदान देत असतो.
पाणी हि निसर्गाची देणगी आहे, सर्वांना पाणी पिता याव साठी 1868 ला स्वत:च्याच घरी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद चालू केला.
1876-1877 खुप मोठा दुष्काळ पडला होता,एक वेळच्या जेवणासाठी लोकं वनवन फिरत होते, भुकेने लोकांची जीव जात होते, तेव्हा महात्मा ज्योतीबा फुलेंनी ठिकठिकाणी 52 अन्नछत्रे चालू केली.असे महान युगपुरुष महात्मा ज्योतीबा फुलेंना स्वत:च मुल नव्हतं म्हणून त्यांच्या वडिलांनी म्हणजे गोविंदरावांनी दुसर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि यासाठी सावित्रीआईचा सुध्दा होकार होता तेव्हा ज्योतीबा रागानेच सावित्रीला म्हणाले “तुही असं म्हणते साऊ” तेव्हा सावित्री हो म्हणतात,आपला ‘वारसा’समोर नेण्यासाठी तुम्ही दुसर लग्न करा, तेव्हा ज्योतीबा म्हणतात की जो माझे कार्य समोर नेणार तो फुल्यांचे नाव चालवील, त्यासाठी दुसर लग्न करण्याची गरज नाही,यावरून महात्मा ज्योतिबांचे किती महान विचार होते हे समजून येते.
स्वत: 40वर्ष चंदनासारखे झिजले, सर्वांना स्वतंत्र जगण्याची संधी दिली अशा महान व्यक्तीला 1888 ला ‘महात्मा’ ही पदवी मिळाली.
त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूरचे राजरत्न सयाजीराव गायकवाड त्यांच्या कार्याची महान चर्चा बघुन फुले दाम्पत्याला भेटायला आले, त्यांचे कार्य बघुन त्यांना गहिवरून आलं,
अशा महान सुर्याचा महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 झाला. त्यांचे विचार त्यांचे कार्य कधिही न संपणारे आहेत त्यासाठी आजच्या तरुण पिढीला सक्षम होण्याची गरज आहे, तेव्हाच आपण फुले दाम्पत्यांचा वारसा समोर नेऊ शकणार.
असे महान क्रांतिकारक या जगात होणे शक्य नाही,परंतु त्यांचे कार्य समोर घेऊन जाण्याचा निर्धार करूया आणि त्यांच्या महान विचारांना वदंन करूया.

जय ज्योती जय क्रांती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here