विसरूनी गेले मीच मला रे…
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात !!
विसरूनी गेले हसणं माझं रे…
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरूनी गेले जगणं माझं रे…
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरूनी गेले नातेवाईक माझे रे…
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
सोडून दिले दुसऱ्यांशी बोलणं माझं रे…
तुमच्या आवडी निवडीच्या नादात!!
विसरूनी गेले माझंच मला रे…
तुमच्या फोनची वाट पाहण्याच्या नादात!!
गमावून बसले आयुष्य माझं रे…
तुमच्या सोबत जगण्याच्या नादात!!
काय होते मी आणि काय झाले रे…
तुमचं समाधान शोधण्याच्या नादात!!
स्वप्नांचा चुराडा करून बसले रे…
तुम्हाला एकत्र ठेवण्याच्या नादात!!
मन माझे झुरत ठेवले रे…
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरले तुम्ही मला कोण आहे रे…
तुमच्या मनमानी वागण्याच्या नादात!!

