सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
चंद्रपूर
आंबेडकरी साहित्य प्रबोधनी चंद्रपूर च्या वतीने काव्य संग्रह प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात अविनाश टिपले चंद्रपूर लिखित “माणसाच्या मनात काही” आणी विजय भगत नकोडा लिखित “संघर्ष आयुष्याचा” या काव्य संग्रहाचे प्रकाशन डॉ, प्रा, विद्याधर बनसोड प्रसिद्ध साहित्यिक चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ, प्रा, इसदास भडके (अध्यक्ष आंबेडकरी साहित्य प्रबोधणी चंद्रपूर) हे होते तर मंचावर भाष्यकार म्हणून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा, कोमल खोब्रागडे चंद्रपूर हे होते. कवी अविनाश टिपले चंद्रपूर आणी कवी विजय भगत मंचावर होते. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली नंतर स्वागत प्रास्ताविक बार सागडे यांनी केले. पुढे कवी अविनाश टिपले चंद्रपूर यांनी “माणसाच्या मनात काही” या काव्य संग्रहा संदर्भात आपले मनोगतात सांगितले. माणसाचे मन जे आहे ते सतत बदलणारे, क्षणाक्षणाला विचलीत होणारे असते. बऱ्याचदा काहींच्या मनावर इतरांनी ताबा मिळविलेला असतो. त्यामुळे त्याचे मन सतत ज्यानी ताबा त्याच्या मनावर मिळविलेला असतो सतत त्याकडे जात असते. म्हणजे त्याचे मन त्याच्या ताब्यात राहत नाही. जसे जीवापाड एकमेकांवर प्रेम करणारे तरुण, तरुणी बाबत आपल्याला सांगता येईल. कधी, कधी, जन्म देणाऱ्या आई, वडिलांनाही विसरतात ज्यानी शिकविले, लहान्याचे मोठे केले. ज्याच्या साठी कस्ट केले त्याग केला.त्याना ही विसरतात. बऱ्याचदा चुकीचा निर्णय घेतात. का? त्याच मन त्याच्या ताब्यात राहत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्या मनाला योग्य दिशा देण्याचे काम, विचलीत होऊ न देण्याचे मार्गदर्शन, त्या मनाला, सुसंस्कारीत,करण्याचे उपाय बुद्धाने सांगितले आहे. आणी प्रज्ञा, शील, करुनेचा संदेश त्यानी मानवाला त्याच्या कल्याणसाठी दिला. त्यामुळे मी माझ्या कविता संग्रहाच्या कव्हर पेजवर वरच्या भागाला बुद्ध भिक्कू संघाला मार्गदर्शन करीत असल्याचे दाखविले आहे आणी खालील भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजाला योग्य मार्गदर्शन करीत असल्याचे मुख पृष्ठावर चित्र रेखाटले आहे. आणी कविता संग्रहात बुद्ध, बाबासाहेब याच्या विचारावर अनेक कविता आहे. “माणसाच्या मनात काही”, ज्ञानाचे प्रतीक,संविधान, लोकशाही, आदर्श बाबासाहेब, काही माणसं, घ्या डॉक्टराचा सल्ला,शिकावं म्हणाले बाबासाहेब, सामाजिक जाणीवेचा पोरगा, अशा अनेक कविता बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आणी काही इतरही असल्याचे कवी अविनाश टिपले म्हणाले. आणी पुढे दोन पुस्तके काढनार असल्याचे त्यानी सांगितले.
प्रा, कोमल खोब्रागडे, माणसाच्या मनात काही या कविता संग्रहावर बोलतांना म्हणाले, की अविनाश टिपले यांनी आपल्या संपूर्ण कविता संग्रहात नेमके काय आहे. हे सांगताना सांगितले की प्रत्येक कविता संग्रहाची प्रस्तावना ही कविता संग्रहाचा सार असतो.त्याच्या कविता संग्रहास प्रस्तावना डॉ, प्रा, इसदास भडके साहित्यिक यांनी लिहली असून त्यात त्यानी बुद्ध, आणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काव्य संग्रहची निर्मिती करण्यात आली असून त्यानी कवितेच्या माध्यमातून बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा त्यानी प्रयत्न केलेला आहे. इतरही कविता त्यात असल्याचे ते म्हणाले. ते पत्रकार आहेत. त्याचे अनेक लेख दैनिकांत येतात.ते मागेपुढे दोन, तीन पुस्तके काढणार असल्याचे ते बोलले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ, प्रा, इसदास भडके आपल्या मार्गदर्शन पर भाषनात म्हणाले, दोन्ही काव्य संग्रहास माझी प्रस्तावना असून त्या कविता संग्रह मध्ये, बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचा रावर कविता संग्रह ची निर्मिती कवीची आहे.बाकी इतरही कविता त्यात आहेत. पहिलाचा कविता संग्रह असल्याने काही उणीवा असू शकतात. पण आंबेडकरी साहित्यात भर घालणारा कविता संग्रह असल्याचे ते म्हणाले. पुढे कवी संमेलन असल्याने त्यानी आपले भाषण आटोपते घेतले.संचालन भावीक सुखदेवे यांनी केले कवी संमेलन दिलीप पाटील गझलकार राजुरा यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडले. पंधरा कवी नी भाग घेतला होता तदनंतर नागेश सुखदेवे यांनी सर्वांचे आभार मानले. मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.

