आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम आदमी पक्षाचा जंगी जल्लोष

0
97

सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
चंद्रपूर

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जटपूरा गेट समोर जल्लोष करण्यात आला.

उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीने दारू घोटाळ्याच्या खोट्या आरोपात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. अटकेनंतर 51 दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे. ते जेल मधून बाहेर पडताच आम् आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जटपूरा गेट समोर जल्लोष करण्यात आला.

या वेळी आप चे नेते सुनील देवराव मुसळे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, जिल्हा संघटणमंत्री योगेश मुरेकर, जिल्हा सहकारी आघाडी अध्यक्ष मधुकर साखरकर, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, अप्लासंख्यक आघाडी महानगर अध्यक्ष जावेद सय्यद, महानगर संघटणमंत्री संतोष बोपचे सिकेंदर सागोरे, शशिकांत मेश्राम, शकील पठाण, सुजाता देठे, रमाना, नजमा बेग, मनीष राऊत, दिपक घोडगे, विजु चांबारे व इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here