‘साहस’ शिबीर सपन्न व ‘अंकुर’ शिबिराला प्रारंभ
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र द्वारा संचालित ब्राइटेज फाउंडेशन तर्फे भिसी तालुक्यातील डॉ. रमेशकुमार गजबे शिक्षण संकुल, पुयारदंड येथे ‘साहस’ शिबिर संपन्न व ‘अंकुर’ शिबिरला प्रारंभ झाला.
‘तूच कर तुझे रक्षण ‘ यां उद्देशाने दि.३ मे पासून सुरू झालेल्या सात दिवशीय साहस निवासी प्रशिक्षण शिबिरात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे म्हणून लाठी-काठी व कराटे प्रशिक्षण देण्यात आले. महिला कायदेविषयक मार्गदर्शन,गटचर्चा,उच्च शिक्षणाची संधी व फेलोशिप , महिलांचे आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले आणि शिबिराची सांगता झाली .
दि.१० मे पासून ‘अंकुर’ निवासी नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबीराला सुरुवात झाली असून महिनाभर चालणाऱ्या शिबिरात पहिल्याच दिवशी १०५ विद्यार्थी नोंदणी करून सहभागी झाले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी विलास चौधरी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र निरीक्षक, वाल्मीक नन्नावरे विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र निरीक्षक, विवेक चौखे सल्लागार विद्यार्थी युवा संघटना तालुकाशाखा सिदेवाही, श्रीकांत एकुडे (जिल्हा शाखा चंद्रपूर महासचिव),आणि नामदेव घोडमारे विद्यार्थी युवा संघटना महासचिव जिल्हाशाखा भंडारा या सर्व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र च्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

