जिल्हाध्यक्ष पावडे यांचा पुढाकार
सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज
येणाऱ्या पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरू नये म्हणून महानगरातील सर्व नाल्यांचा गाळ उपसून ते स्वच्छ करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांची उपस्थिती होती.
पावडे म्हणाले,चंद्रपूर शहर नदीच्या काठावर वसलेले शहर असून शहरातूनच नदी प्रवाहित होते.या नद्यांना जोडणारे अनेक छोटे मोठे नाले आहेत.या नाल्यांचे अवलोकन केल्यास ते गाळ न उपसल्याने उथळ झाले आहेत.महत्वाचे म्हणजे नगिनाबाग प्रभाग क्र.09 मध्ये असलेले मोठे नाले व नाल्या सर्वात जास्त त्रासदायक आहेत पावसाळया आधी सर्व नाले साफ करून देणे अत्यंत आवश्यक आहे. दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पाऊस जास्त प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर परीसर नेहमी पावसाच्या पाण्याने भरलेला असतो त्यामुळे येथील नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता जास्त असते. करीता पावसाळा लागण्या अगोदर, शहरातील मोठे नाले व नाल्यांची साफ सफाई मोहिम राबविने अत्यंत गरजेचे आहे, करीता विशेष साफ सफाई मोहिम लवकरात लवकर चालु करावी अशी मागणी त्यांनी केली.
दुर्घटना टाळा-चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा- महानगर भाजपाचे मनपाला निवेदन
मुंबईत 13 मे 2024 विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली.अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही. म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर,चांद सैय्यद, रवी चाहरे,रुद्रनारायण तिवारी,पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती.
पावडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये सुध्दा होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना होऊ शकतात., म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे.
मुंबई येथील घडलेली दुर्घटना अत्यन्त दुखदायी आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जवाबदार आहे. अनधिकृतपणे मुंबईत ते विशाल होर्डिंग लावण्यात आले.अशी स्थिती येथेही नाकारता येत नाही.करीता, शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जचे सर्व्हे करून ऑडीट करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली.

