रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी – स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी. येथील विद्यार्थ्यानी AIUI च्या आंतर विद्यापीठ स्पर्थेत सुयश मिळवले आहे महाविद्यालयाचे सात विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ वुडबॉल संघात आंतरविद्यापीठ स्पर्धेकरीता निवडले गेले होते त्यात मयूर कामडी, राकेश दिघोरे, प्रज्वल लाडे, सुबोध आलेवार यांचा पुरुष गटात तर वैधवी मेश्राम, सुजिता रंधये व स्नेहा शेंडे या विद्यार्थिनींचा महिला गटात समावेश होता. भोपाळ येथील जे. एन. सी. टी. विद्यापीठात झालेल्या या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या महिला व पुरुष चमूने तिसरा क्रमांक पटकाविले या विद्यार्थ्यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत वैयक्तिक गटात महाविद्यालयाचा मयूर कामडी हा विद्यार्थी सिल्व्हर पदकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत विद्यापीठाचे प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे प्रशिक्षक शाहरुख शेख तर सह प्रशिक्षक म्हणून वैशू मेश्राम यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
महाविद्यालयाची खेळाची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवण्यात महाविद्यालयाने यश मिळविले या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्याच प्रमाणे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश कांबळे उपाध्यक्ष मा. मारोतराव कांबळे,सदस्य रीमा कांबळे व स्निग्धा कांबळे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. त्याच बरोबर प्रभारी शारीरिक निदेशक डॉ. लोकेशकुमार नंदेश्वर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.

