375 रक्तदात्यांनी केले रक्तदान
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना प्राप्त होताच त्यांनी आपल्या पोलीस विभागा मार्फत ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात यावे, असे निर्देश दिले. त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून 2024 ला सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबीरास सिंदेवाही तालुक्यातील नागरीकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत याठिकाणी 375 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मागील दहा दिवसांपासुन काटेकोरपणे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते; त्या करीता तालुक्यातील पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे, व्यापारी, धार्मिक संस्था/संघटना यांनी जोर बांधला होता. तसेच शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, वन विभाग, सिंदेवाही शहर व्यापारी असोसिएशन, होमगार्ड पथक, पत्रकार मंडळींसह आदिंनीही विक्रमी रक्तदानासाठी मोलाचे सहकार्य केले.
रक्तदान शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण, सपोनि अतुल स्थुल, पोउपनि अनील चांदोरे, पोउपनि सागर महल्ले व सहकारी पोलीस अंमलदार रणधीर मदारे, सत्यवान सुरपाम, मंगेश मातेरे, शरद सावसाकडे, संजीव गेडेकर, सुरज जांभुळे, डॉ. अमीत प्रेमचंद, डॉ. मिलींद झाडे, पंकज पवार, रक्तपेढी चंद्रपूर रक्तपेढीचे डॉ. रोहन झाडे, व त्यांची संपूर्ण टिम, ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही आदींनी परिश्रम घेतले.

